कोणत्याही कर्ज माफी योजनेचा लाभ मायक्रोफायनान्स कर्जाना मिळणार नाही

 

भारतामध्ये, आपण वेळोवेळी विभिन्न राज्यांमध्ये कर्ज माफी योजनांच्या घोषणा केल्या जाताना ऐकतो. या कर्ज माफी योजना फक्त बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जांसाठी लागू आहेत. मायक्रोफायनान्स कर्जे जी साधारणपणे छोट्या व्यवसाय गतिविधींसाठी दिली जातात ती पीक कर्ज म्हणून प्रमाणित नसतात. असे असले तरीही असे अनेक प्रसंग घडताना दिसून येतात जेथे हितसंबंध गुंतलेले काही स्थानिक गट कर्ज माफीविषयी खोट्या अफवा पसरवतात आणि मायक्रोफायनान्सच्या कर्जदारांमध्ये गोंधळ निर्माण करतात.भारतामध्ये, मायक्रोफायनान्स संस्थांचा जन्म गरीब आणि अल्प-उत्पन्न घरांना योग्य वेळेत आणि परवडण्याजोगे क्रेडिट पुरवण्याच्या गरजेतून झाला. मायक्रोफायनान्स कंपन्या काटेकोरपणे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करतात ज्यामुळे कर्ज देणे आणि वसूल करण्याच्या विश्वासार्ह प्रथांद्वारे ग्राहकाच्या हितसंबंधांच्या रक्षणाची खात्री होते. आरबीआयच्या व्यतिरिक्त, ग्राहकाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर स्व-नियंत्रित मंडळे जसे एमएफआयएन आणि साधन संस्था यांच्याकडूनही नियंत्रण ठेवले जाते. एमएफआयएन अनुसार, मायक्रोफायनान्स कंपन्या सद्य स्थितीत भारतातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 610 जिल्ह्यांमध्ये आर्थिक सहाय्य पुरवत आहेत. मायक्रोफायनान्सची ही अतिप्रचंड व्याप्ती भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनली आहे.कोल्हापूर महाराष्ट्र येथील मेघा, मायक्रोफायनान्सची एक कर्जदार आहे. तिने मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आणि तिचा बांबूच्या वस्तु बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचा वापर केला. कोणत्याही कटकटीशिवाय क्रेडिट उपलब्ध होण्याची संधी तिला दिली गेली आणि तिने त्या संधीचा फायदा घेतला. वक्तशीरपणे दिलेले परतफेडीचे हप्ते आणि भविष्यात नियमित कर्ज प्राप्त होण्याच्या सुविधेसह, तिचा व्यवसाय आता भरभराटीला आला आहे. तिने तिच्या व्यवसायातून मिळत असलेल्या फायद्याने तिचे घर सुद्धा पुन्हा बांधले आहे. राधिका, कोल्हापूरमधील अजून एक मायक्रोफायनान्स कर्जदार, तिने तिचा व्यवसाय आणि जीवनावश्यक गरजांसाठी मायक्रो कर्ज घेतले. कर्ज नियमितपणे मिळण्याची सुविधा आणि राधिकाने वक्तशीरपणे दिलेले परतफेडीचे हप्ते यामुळे तिच्या तसेच तिच्या कुटुंबाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव झाला आहे. एका विशिष्ट एमएफआयकडून तिने घेतलेल्या कर्जाच्या मदतीने, ती यशस्वीपणे लाकडापासून बनवलेल्या खेळण्यांचे एक उत्पादन यूनिट आणि स्टोअर चालवते आहे. ती तिच्या मुलांना देखील कोणताही अडथळा न येता नियमित शिक्षण पुरवण्यात सक्षम झाली आहे. असे निरिक्षणात आले आहे कि जर एखाद्या स्त्रीला योग्य संधी मिळाली, तर ती पूर्ण क्षमतेने त्यांचा उपयोग करते.भारतामध्ये मागील तीन दशकांत, मायक्रोफायनान्स संस्थांनी मेघा आणि राधिका यासारख्या लाखो स्त्रियांना फक्त त्यांच्या व्यवसायाला आर्थिक सहाय्य पुरवून मदत केली इतकेच नव्हे तर त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी घरकर्जे, शिक्षण कर्जे, स्वच्छता कर्जे, इत्यादी प्रकारांच्या कर्जांसह एक शाश्वत जीवनशैली निर्माण करण्यात देखील मदत केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!