
कोल्हापूर/प्रतिनिधी : कै.श्रीपतराव बोंद्रे हे लोकाभिमुख नेते होते. शेती व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे त्यांनी कार्य केले लोकांमध्ये उतरून त्यांचे दुःख जाणून झटणारे नेते होते असे उदगार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी काढले कोल्हापूर येथील दसरा चौक येथे श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय परिसर येथे आयोजित केलेल्या कै.श्रीपतराव बोंद्रेदादा जन्मशताब्दी सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार पी. एन.पाटील – सडोलीकर, खासदार प्रा. संजय मंडलिक यांची उपस्थिती होती. यावेळी या उपस्थितीत पाहुण्यांसह विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.श्रीपतराव बोंद्रे दादांच्या प्रतिमेचे पूजन व पुतळ्यास पुष्पांजली व हार अर्पण करण्यात आला.यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते “आठवणीतली दादा” या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.तर माजी आम.पी. एन. पाटील – सडोलीकर यांच्या हस्ते “शहाजी वार्ता” या त्रैमासिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.तर भित्तिपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले.यावेळी कै.दादांचे कार्यकर्ते यांचा सत्कार शाल,स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यामध्ये मालती बोंद्रे ,आप्पा बिजगे, नामदेव कांबळे, बाबासाहेब पाटील, भूयेकर, बाबुराव हजारे, सदामामा पाटील, मारुती पाटील माजी उपसभापती करवीर पंचायत समिती, राहुल माने, एम.आर.पाटील माजी संचालक भोगावती सहकारी साखर कारखाना),संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, सुरेश मोरे, दगडू पाटील,शिवाजी भोसले (कांचनवाडी),आनंदराव पाटील, पी.डी.पाटील, शिवाजी पाटील, पांडुरंग सरनाईक,दादासाहेब खोत,रामराव बोंद्रे, गोपाल पाटील आदींचा सत्कारामध्ये समावेश होता.
यावेळी बोलताना माजी आम.पी.एन. पाटील यांनी दादांच्या आठवणी सांगितल्या. शिवाजी पेठेत पांढरी टोपी घालून वावरणारे दादा हे एकमेव व्यक्ती होते. दादांनी कधीही पांढरी टोपी डोक्यावरून काढली नाही त्यांचा कायम दरारा होता असे सांगून कोल्हापूरचे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. पुढे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना देशाचे कृषिमंत्री पद घेण्याचा आग्रह धरला. आणि ते कृषिमंत्री झाल्याचे सांगितले. कोल्हापूर मध्ये के.एम.टीची सुरुवात ही पहिली त्यांनी केली असून त्यांनी शेतकऱ्यांना जागे केले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वीज बिलाची आकारणी केली जात असे, त्यावेळी त्यांची बिले कमी करण्यामध्ये दादांचा मोठा वाटा होता असे सांगितले. काँग्रेस भक्कम करण्यामध्ये कोल्हापूर मध्ये त्यांचा वाटा होता.शेतामध्ये किती टन ऊस काढायचा याबाबतचे मार्गदर्शन त्यांचे आदर्शवत होते. आज शंभर वर्षे झाली आहेत. द्विशताब्दी त्यांची साजरी करत असताना आम्ही जिवंत नसू मात्र त्यांचे विचार हे पुढील पिढीला समजणे आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार संजय मंडलिक यांनी दादांविषयी बोलताना सांगितले मी लहान होतो त्यावेळी मला माझे बाबा कार्यक्रमांमध्ये घेऊन जात होते. त्यावेळी दादांची आणि माझी ओळख झाली. दादांबद्दल मला फारशी माहिती नाही. पण त्यांचे विचार आणि कार्य हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार घेऊन दादांनी वाटचाल केल्याचे सांगितले. विशेषता त्यांच्यावर महात्मा फुलेंचा जास्त पगडा होता असे सांगून आता दादांची शताब्दी कार्यक्रम पार पडला पण, त्यांची द्विशताब्दी साजरी करून त्यांचा आदर्श शंभर वर्षांनंतरही जन्माला येणाऱ्या पिढीला माहीत असणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य आर.के. शानेदिवाण यांनी मी कॉलेजचे प्राचार्य दादांमुळे झालो. माझ्यासारख्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना त्यांनी पुढे आणले. मी त्यांचा ऋणी आहे, असे सांगितले.यावेळी भूपाल पाटील, विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर दादांचे नातू शाहू छत्रपती शिक्षण संस्था चेअरमन मानसिंग बोंद्रे,राजू जाधव,पंडित बोंद्रे,करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे,माणिक मंडलिक,शिवाजीराव कवठे,बाबासाहेब पाटील भुयेकर, धैर्यशील देसाई,राहुल पाटील,इंद्रजित बोंद्रे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply