गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

 

कोल्‍हापूर :गार्डन्‍स क्‍लब कोल्‍हापूर यांच्‍याकडून दिला जाणारा “हरित समृध्‍दी” पुरस्‍कार गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्‍याबद्दल गोकुळच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये  माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत त्यांचा सत्‍कार करण्‍यात आला.एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्‍या  पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून  नवे मापदंड निर्माण केले. अरुण नरके यांनी गेली ४५  वर्षे सातत्याने डेअरी, कृषि आणि सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विविध सामाजीक कार्यामध्‍ये त्‍यांचा पुढाकार नेहमिच राहिला आहे. “हरित समृध्‍दी पुरस्‍काराने त्‍यांच्‍या कार्याची त्‍यांना पोच पावती  हरितयोध्‍दा म्‍हणूनच  हा प्रथम वर्षीय पुरस्‍कार त्यांना मिळाला आहे.  याबरोबरच शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्‍यापक डॉ. तुकाराम द. डोंगळे यांचा महाराष्‍ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्‍स यांच्‍यातर्फे “यंग असोसिएट्स”  या पदावर निवड झाल्‍याबद्दल  व संघाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कैलाश पुकळे यांनी विभागीय कार्यालय हातकणंगले परिसरात गोचीड तापावर प्रतिबंध करणेसाठी जास्‍तीत-जास्‍त लसीकरण  करून जनावरांचे आरोग्‍य चांगले राखण्‍याचे काम केलयाबद्दल यांचाही सत्‍कार संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्‍या हस्‍ते करणेत आला.गोचिड तापामध्‍ये जनावरांचे तापमान १०५ f ते १०६ f पर्यंत जाऊन रक्‍तातील हिमोग्‍लोबीनचे प्रमाण कमी होते. जनावरे अशक्‍त होतात, डोळ्यांमधुन पाणी येते तसेच रक्‍ताचे प्रमाण कमी झाल्‍याने जनावरे बसतात व उपचार न झालेस  दगावतात. वरील सर्व त्रास टाळण्‍याकरिता गोचीड ताप लसीकरण हा रामबाण उपाय आहे. ते करूण घेतल्‍यास  या आजारापासुन जनावरांना पुर्णपणे मुक्‍तता मिळते. असे डॉ. कैलाश पुकळे यांनी सत्‍कारा दरम्‍याण सांगीतले.यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील (आबाजी), अरूण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, आमदार व संचालक राजेश पाटील, पी.डी. धुंदरे, धैर्यशिल देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, रामराज देसाई-कुपेकर, विजय तथा बाबा देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई),सौ. अनुराधा पाटील(वहिनी), कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी,व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!