
कोल्हापूर : कोरोना महामारीने झालेले नुकसान व समाजातील सर्वच स्तरावर झालेला त्याचा आर्थिक परिणाम तसेच नवीन येवू घातलेली कोरोनाची साथ या पार्श्वभुमीवर करवीरचे आमदार मा.श्री. पी.एन. पाटील यांनी आपला आजचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.राजारामपुरीत त्यांच्या निवासस्थानी गोकुळ परीवारावातर्फे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक श्री.विश्वास पाटील (आबाजी) यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतरवेळी आमदार पी.एन.पाटील यांचा वाढदिवस म्हणजे राजकीय तसेच सामाजीक विविध स्तरातील लोकांचा त्यांच्या बंगल्यावर दिवसभर राबता असायचा पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस अंत्यत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोकुळचे संचालक बाळासो खाडे, इतर मान्यवर शिवाजी कवठेकर, भारत पाटील-भुयेकर, विश्वजीत पाटील सडोलीकर, सचिन पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी पी.आर. पाटील यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या .
Leave a Reply