
इचलकरंजी : “आम्हा तृतीयपंथीयांना समाजाशी एकरुप करून सन्मानाने जगण्याचं बळ देणारी व खऱ्या अर्थाने सावित्रीची लेक असणारी व्यक्ती म्हणजे ऍड दिलशाद मुजावर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सवाचा महत्वाचा सोहळा साजरा करत असताना , त्यात आम्हाला सामावून घेतले हेच सावित्रीबाई फुले यांच्या त्या वेळच्या कष्टाचं फळ आहे “असे मत पिया ऊर्फ प्रशांत सवाईराम यांनी व्यक्त केले.
रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.राष्ट्र सेवा दल आणि कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थी समिती यांचेवतीने झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक विभावरी नकाते यांनी केले. तृतीयपंथी हक्क संरक्षण महामंडळ याच्या सदस्य ऍड दिलशाद मुजावर, बसवराज कोटगी, रिया पारसे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी संजय रेंदाळकर यांचे संकल्पनेतून साकारलेले तथा रेश्मा खाडे आणि प्रणिता वारे यांनी संकलित केलेले ‘सावित्री वदते’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
ऍड ,दिलशाद मुजावर म्हणाल्या, ” महिलांना त्यांचे हक्काचे आकाश मिळवून देणार्या सावित्रीबाईंचा जन्मदिन सणाप्रमाणे साजरा करण्याची राष्ट्र सेवा दलाची पद्धत जनमानसात रुजली, भरघोस प्रतिसाद मिळाला याचा अर्थ समाजाची तब्येत ठिक होण्याच्या शक्यता असल्याप्रमाणे आहे. ” कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बसवराज कोटगी यांनी सावित्री उत्सवाचे महत्व आणि झालेल्या सर्व कार्यक्रमांचे कौतुक आपल्या भाषणात केले.
आभारप्रदर्शन संजय रेंदाळकर यांनी केले. यावेळी सौ स्मिता अतुल बुगड, ऍड , हेमलता नेमिष्टे, प्रणाली दैव, स्नेहल माळी, रुचिता पाटील, सोहेल शेडबाळे, ओम कोष्टी, कोमल माने, पूजा केर्ले, दिपाली कांबळे, प्रविण आंबले, दामोदर कोळी साद चाँदकोटी आदि कार्यकर्ता उपस्थित होते.
Leave a Reply