श्री अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार:नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

 

कोल्हापूर: शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार दि.०८ जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. काल दिवसभर झालेल्या बैठका आणि इतर कार्यक्रमाच्या व्यस्त दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापुरात मुक्काम केला. आज सकाळी त्यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे नमूद करीत श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुगी व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी दिल्या.सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे श्री अंबाबाई मंदिरात आले. श्री अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर असून, पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित रु.८० कोटींच्या निधी पैकी फक्त रु.९ कोटी रुपये निधी मिळाल्याचे सांगत उर्वरित निधी लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली. यासह मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने ५ फुट थराचा १ हजार टन वजनाचा सिमेंटचा कोबा केले आहे. शिवाय झाडांची मुळे मंदिर बांधणीचे नुकसान करीत आहेत. ही स्थिती आता अंत्यंत धोकादायक वळणावर असून, तातडीने हा कोबा काढणे गरजेचे असल्याची माहिती दिली.
यावर बोलताना नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी, महाराष्ट्र राज्य शासनाने पुरातन मंदिरांच्या विकासाचा व देखरेखीचा अधिकार नगरविकास खात्याकडे दिला असून, नगरविकास मंत्री या नात्याने श्री अंबाबाई मंदिरात होणाऱ्या दुरुस्तीस आवश्यक परवानगीची आणि लागणाऱ्या निधीची जबाबदारी घेत असल्याचे सांगत. मंदिरात झालेल्या पडझडीची किंवा कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव देवस्थान समितीने तातडीने सादर करावा त्यास निधी देवून मंदिराची पडझड तात्काळ थांबवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!