
कोल्हापूर: १४ जानेवारी पानिपत शौर्यशाली रणसंग्राम दिन… या दिवशी मराठ्यांनी पराक्रम दाखवून एक प्रकारे विजय मिळवला… हा विजय म्हणजे अब्दाली पुन्हा कधीही हिंदुस्थानवर चालून आला नाही… या युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या मराठ्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील मराठा मावळे आज पानिपतच्या दिशेने मार्गस्थ झाले. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राज्याचे प्रमुख मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध राज्यातील मराठा मार्गस्थ झाले. त्यांना ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आनंद पाटील, वसंतराव मुळीक, मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रज्ञा जाधव, विनोद साळुंखे आदी उपस्थित होते.
Leave a Reply