युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा; संघाची महिला कार्यकारिणी जाहीर

 

पुणे: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य
वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुण्यात राज्य महिला कार्यकारणी व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
संघ संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले’ पत्रकार हा नि:पक्ष, निर्भीड व चारित्र्य संपन्न असला पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन न्यायिक व आशावादी आहे. असा विश्वास ठेवणाऱ्या वाचक वर्ग आणि सर्वसामान्यांचे हित पत्रकारांनी जपले पाहिजे. अन्यायाविरुद्ध लिखाण करीत असताना आपल्यावरही अन्याय होतो आहे का, किंवा न्यायाची बाजू घेत आपली लेखणी जेंव्हा तळपते तेंव्हा त्या पत्रकाराला अनेक वाईट प्रसंगाला समोरे जावे लागते.याची जाण युवा पत्रकार संघाने ठेवून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी पत्रकार व पत्रकार कुटुंबाच्या कल्याणासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र कोल्हापूर येथे स्थापना करण्यात आली. संघाच्यावतीने आजपर्यंत प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांची एकजुट निर्माण केली आहे.यामुळे पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात यश आले असून इथून पुढेही पत्रकारांना शासन स्तरावर असलेल्या योजनाचा लाभ देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्नशील राहील. राज्यामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत. प्रत्येक संघटनेचे ध्येय, उद्देश, घटना वेगळी असून महिला पत्रकारांना संघटनेच्या पदाधिकारी पदांमध्ये कमी वाव असतो. पण युवा पत्रकार संघाने २०२१ या नूतन वर्षानिमित्त महिला पत्रकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून याची स्वातंत्र विभागणी केली आहे. त्यामध्ये राज्य महिला अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष, जिल्हा महिला अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, व प्रदेश महिला अध्यक्ष अशा पद्धतीने कार्यकारिणी तयार केली आहे.यामध्ये राज्य महिला अध्यक्षपदी अर्चना चव्हाण, राज्य महिला कार्याध्यक्षपदी अस्मिता जाधव,पुणे शहर महिला अध्यक्षपदी सुरेखा मेंढे यांची निवड करून पत्रकार महिलांचा मोठा सन्मान केला आहे.
पुढील कार्यकारणी त्या-त्या जिल्ह्यामध्ये त्या-त्या तालुक्यामध्ये राज्य महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य संघटक पदी राहुल नळकांडे , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी संतोष सावंत, पुणे जिल्हा अध्यक्ष दयानंद वाडकर, प्रदेश सचिव संतोष भोसकर यांची निवड करण्यात आली, प्रदेश उपाध्यक्ष संपादक जितू कळंत्रे यांनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी राज उपाध्यक्ष जावेद देवडी, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कुरणे, कोल्हापूर जिल्हा सचिव संतोष पवार व मोठ्या संख्येने पत्रकार, हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!