
कोल्हापूर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने स्व.पै. खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला.तसेच दिव्यांग खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कोरोना काळातील आर्थिक सहाय्य निधीचे वाटप आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी, भवानी मंडपातील त्यांच्या कीर्ती स्तंभास अभिवादन केले.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मा. महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर शोभा बोंद्रे, बिभीषण पाटील, आर.डी पाटील, दीनानाथ सिंह, टेनिसपटू साळुंखे मॅडम, क्रीडा जिल्हाधिकारी चंद्रशेखर साखरे, खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव जाधव आदी उपस्थित होते.
Leave a Reply