
कागल:मतदार संघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ज्यांची ऐपत आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे आणि गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे.कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयात कोरणा प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण शुभारंभ झाला यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनिता पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.संपूर्ण जग वर्षभर शोधात होते, त्याचे उत्तर या लसीच्या रूपाने सापडले आहे.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढाईत कोरोना योध्द्याबरोबरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ नेहमीच अग्रभागी राहिले. या लसीची निर्मिती ही एक क्रांतीच आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्याद्वारा ही एक दर्जेदार व गुणवत्तापूर्वक लस निर्माण झाली आहे. या लसीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका.
यावेळी प्रवीणसिंह पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ. पुनम महाडिक – मगदूम, उपसभापती सौ. अंजना सुतार, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. अभिजित शिंदे, माजी सभापती सौ राजश्री माने आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ रवी बल्लाळ यांनी केले.
गोरगरिबांना मोफत लस द्या……..
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी ही लस जानेवारीत उपलब्ध होईल असा शब्द दिला होता. बोलल्याप्रमाणे त्यांनी तो शब्द खरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी मागणी आहे की ज्यांची ऐपत आहे त्यांना बाजारात ही लस उपलब्ध करून द्या. तसेच गोरगरिबांना ही लस मोफत मिळालीच पाहिजे.
Leave a Reply