
कोल्हापूर: कोल्हापूरात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला.आज सीपीआर रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल,सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला.सुरक्षेच्या दृष्टीने ही लस महत्वाची असून टप्प्याटप्प्याने ही लस सर्वाना पोहोचवली जाणार आहे.कोरोनाच्या मोहिमेत अग्रभागी असणारे डॉक्टर,परिचारिका,आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे.
याप्रसंगी,आमदार चंद्रकांत जाधव,आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, डीन मोरे, डॉ. पावरा आदी उपस्थित होते.
Leave a Reply