
कोल्हापूर/प्रतिनिधी: भारत सरकारच्या वतीनं संरक्षण क्षमता महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलीयमचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत दिली.
भारत सरकारच्या वतींन ऊर्जा सुरक्षा,शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी संरक्षण क्षमता महोत्सव हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यकर्मा राबवण्यात येणार असून जीवाष्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढत ओझं कमी करण आणि इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामा पासून पर्यावरणाच रक्षण करण हे या कार्यक्रमाचा अंतिम लक्ष आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यावरण आणि इंधनाचा अपव्यय या विषयावर स्पर्धा आयोजित केल्या आहेत.यामधून लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.अशी माहिती भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कोल्हापूर विभागातील सहाय्यक व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबद्दल अधिक माहिती देताना मनोज गुप्ता म्हणाले”
कार्यशाळांच्या माध्यमातून इंधन संवर्धनावरील मोहिमविषयी सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेऊन चर्चा घडवून आणण्याचा देखील मानस आहे. जिल्ह्यातील जवळपास 308 पेट्रोल पंपामध्ये त्यादृष्टीने जनजागृती करणारे फलक उभारण्यात येणार असून पेट्रोल पंपावर स्वछता तसेच पर्यावरणपूरक उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत.कोल्हापूर शहरात या कार्यक्रमांतर्गत 31 जानेवारी रोजी पोलीस ग्राउंड इथून सकाळी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे.भारत सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही मनोज गुप्ता यांनी केले.पत्रकार परिषदेस इंडियन ऑईल कार्पोरेशनचे सहाय्यक व्यवस्थापक चंद्रभान नंदनकर, हिंदुस्तान पेट्रोलियमचे हर्षद कुंभार,स्मित कोठारी, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.
Leave a Reply