
कोल्हापूर : इंडियन फार्मर फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि.,नवी दिल्ली (इफको) कंपनीचे एम.डी. डॉ.यु.एस.अवस्ती यांच्या संकल्पनेतून सहकारातील अग्रगण्य खत कंपनीच्या वतीने शिरोली दुमाला (ता.करवीर) येथे हिवाळ्यात उपयुक्त असे ब्लँकेट गरजूंना वाटप करण्यात आले. इफकोचे आमसभा सदस्य व गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील (आबाजी),शामराव पाटील वाळोलीकर, जिल्हा क्षेत्र अधिकरी विजय बुनगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी विश्वास पाटील म्हणाले जगातील ३०० कंपन्यामध्ये इफकोला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. खते उत्पादन व विक्रीतील ही मोठी व सर्वांत जास्त २०% डिव्हिडंड देणारी प्रथम संस्था आहे. इफको कंपनीने कोरोना काळात तसेच वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. इफकोचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. प्रारंभी एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूलच्या शिक्षिका माया भोगावकर यांना शिक्षण जागर पुरस्कार मिळालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उर्मिला विश्वास पाटील, रयत संघाचे मॅनेजर तानाजी निगडे, वीरशैव बँकेचे माजी चेअरमन व संचालक अनिल सोलापुरे,नंदकुमार पाटील, माधव पाटील, सरपंच रेखा मच्छिंद्र कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, एस.के.पाटील, माजी पं.स.सदस्य सुनील पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, मच्छिंद्र कांबळे, अरविंद देसाई,गोकुळ चे सचिन पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी,महिला उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक युवराज भोगम यांनी मानले.
Leave a Reply