प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

 

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प येथील कार्यस्थळावर गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना अरूण नरके  यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्‍पादक, शेतकरी,वितरक व ग्राहक यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा गोकुळ परिवारातर्फे दिल्‍या.गोकुळ संघाच्‍या ताराबार्इ पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिं‍ह पाटील यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्‍हातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. तावरेवाडी येथील शितकेंद्रावर संचालक आमदार राजेश पाटील, बोरवडे येथील शितकरण केंद्रावर विलास कांबळे, लिंगनूर येथील शितकरण केंद्रावर रामराज देसार्इ-कुपेकर, गोगवे येथील शितकरण केंद्रावर संचालिका अनुराधा पाटील, शिरोळ येथील शितकेंद्रावर असि.मॅनेजर एस.जी.अंगज , कागल पशुखाद्य येथील सेंटरवर सहा.व्यवस्थापक मुजूमदार, गडमुशिगी पशुखाद्य येथील जेष्ठ कर्मचारी शिवाजी कांबळे , या मान्‍यवरांचे हस्‍ते ध्‍वजारोहण करणेत आले.यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक-प्रशासन डी.के.पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!