
कोल्हापूर: कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आयोजित करण्यात येणारा कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव स्तुत्य उपक्रम असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली.येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सवाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर सुधारित घटना व नियम पुस्तिकेचे प्रकाशन, कोरोना योद्धे व नूतन सभासदांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, आज प्रत्येक सराफ पेढीला आपला पारंपरिक ग्राहक टिकवून ठेवायचा असेल तर त्याला दागिन्यांतील विविधता ठेवण्याबरोबरच नवनवीन व्यावसायिक प्रकार अवलंबले पाहिजेत. त्यातूनच सुरू होणारा कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव ग्राहकांना आणखी आकर्षित करेल यात शंका नाही.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले. श्री. सावंत यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल श्री. महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांनी केले. संस्थाध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी संस्थेचा कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, अध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते संस्थेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक वैष्णवी पाटील, सचिव रवींद्र राठोड, संचालक भरत ओसवाल, प्रीतम ओसवाल, शिवाजी पाटील, सुरेश गायकवाड, संजय जैन, किशोर परमार, सुहास जाधव, तेजस धडाम, प्रसाद कालेकर, डॉ. श्वेता गायकवाड, माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजेश राठोड, नितीन ओसवाल, शीतल पोतदार यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply