गोकुळचा गुजरातच्‍या बाजारपेठेत दिमाखात प्रवेश

 

कोल्‍हापूर: पारंपा‍रीक गुणवत्‍तेला आधुनिकतेची जोड देत गोकुळचे “सिलेक्‍ट” ट्रेट्रापॅक दूध आजपासून गुजरामधील हिंम्‍मतनगर व अहमदाबाद मधील रिलायन्‍स मॉलमध्‍ये विक्रीस उपलब्‍ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्‍य देत गोकुळला पसंती दिली असुन, गोकुळ दूधाची गुणवत्‍ता व स्‍वाद अखेर गुजरात मध्‍ये पोहचला आहे.बाजारपेठेतील अमुलच्‍या वर्चस्‍वाला शह देत गोकुळने आपाली नेहमीची बाजारपेठ स्थिर ठेवत आज गुजरात मध्‍ये प्रवेश केला. कोल्‍हापूरच्‍या कसदार मातीतील  सकस हिरव्‍या वैरणीबरोबर महालक्ष्‍मी पशुखाद्याचे विविध प्रकार जनावराच्‍या आहारात असलेने गोकुळच्‍या दूधाला एक वेगळा स्‍वाद व गुणवत्‍ता आहे. महाराष्‍ट्रातील मुंबई, पुणे, रत्‍नागीरी, सांगली बरोबर गोव्‍यातील ग्राहक सुद्धा गोकुळच्‍या दूधाला प्राधान्‍य देतात. यासंदर्भात माहिती देताना गोकुळे चेअरमन रविंद्र आपटे म्‍हणाले, अतिरीक्‍त दूधाचे रूपांतर करण्‍यासाठी होणा-या खर्चास व त्‍यातून होणारा तोटा कमी करण्‍यासाठी जास्‍तीत-जास्‍त बाजारपेठा काबीज करणे गरजेचे आहे. तसेच आलिकडील काही कालावधीतच भारताच्‍या संपूर्ण प्रमुख शहरामध्‍ये गोकुळ दूध उपलब्‍ध करून दि‍ले जाईल. व याचे सर्व श्रेय  दूध उत्‍पादक शेतकरी, दुध संस्‍था, वितरक, व कर्मचारी यांना जाते असे ते म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!