
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूकीच्या तयारीसाठी आता आम आदमी पार्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. यामध्ये शहरातील मतदारांसोबत ‘मिसळ पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम गेला महिनाभर सुरू आहे, तसेच बाजारपेठांमध्ये फिरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून देणगी स्विकारत ‘लोकवर्गणीतून महानगरपालिका निवडणूक’ यासारखे उपक्रम ‘आप’कडून राबिवले जात आहेत. यातच आता रिक्षा प्रचाराचा शुभारंभ करून पार्टीच्या प्रचाराचा विस्तार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जात आहे.दिल्लीच्या निवडणुकांमध्ये रिक्षा चालकांनी आम आदमी पार्टीची साथ दिली, कोल्हापुरात देखील सामान्यांचा आवाज बनलेल्या आम आदमी पार्टीला रिक्षा चालकांचा पाठिंबा लाभत आहे. रिक्षा प्रचारात रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे असे मत बिंदू चौक येथे पार पडलेल्या रिक्षा प्रचाराच्या शुभारंभात बोलताना महानगरपालिका प्रचार प्रमुख संदीप देसाई यांनी व्यक्त केले.बिंदू चौकातून स्वच्छता महिमेद्वारे झाडू फिरवत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. हा झाडू आता शहरभर फिरणार असून आम आदमी च्या झाडूची चर्चा शहरभर होऊ लागलेली आहे.यावेळी प्रचार प्रमुख संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, राकेश गायकवाड, इलाही शेख, आनंदराव वणीरे, बाबुराव बाजरी, रमेश गावडे, कृष्णात सूर्यवंशी, वैशाली कदम, बसवराज हदीमनी, रविराज पाटील, महेश घोलपे, आदी उपस्थित होते.
Leave a Reply