प्रथमेश व काजलचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘ओह माय घोस्ट’

 
मुंबईत अंधेरी येथील सीटी माॅल मधील पीवीआर ईसीएक्स मध्ये सिनेमा ‘ओह माय घोस्ट’ मधील मुख्य कलाकार प्रथमेश परब व  काजल शर्मा बरोबर मजेदार गप्पा-गोष्टी केल्या. हॉरर कॉमेडी टाइपचा हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.अभिनेता प्रथमेश परब ने आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले कि ‘ओह माय घोस्ट’ हा विनोदी टाइपचा मराठी सिनेमा असून ही जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकत नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे घडत आहे, असे त्याला वाटू लागते व त्याच्या जीवनातील समस्या अधिकच गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो व हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो व नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते.
त्याचबरोबर प्रथमेश ने देव व भुताबद्दल सांगितले कि माझा देवा बरोबर भुतावर देखील तितकाच विश्वास आहे. देवाकडून सकारात्मक ऊर्जा मिळते तर भूता व्दारे नकारात्मक शक्ति येते. हया भूतलावर दोन्ही गोष्टी आहेत.
अभिनेत्री काजल शर्मा ने हया सिनेमातील रोल बद्दल सांगितले कि प्रथमेशच्या अपोजिट मी हीरोईन आहे व मी काजलची धडाकेबाज भूमिका केली आहे. हा एक थरारक भयपट चित्रपट असून विनोदाचा जोरदार तडका देखील दर्शकांना पहावयास भेटणार आहे. प्रथमेश सोबत काम करताना फारच मजा आली. दर्शकांना रोमांचक व रोमांचित करणारी प्रेमकथा देखील बघावयास मिळणार आहे.
हया चित्रपटाचे चित्रीकरण मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद येथे झाले आहे व त्या बंगल्यात शूटिंग करताना फारच मजा आली.
डायरेक्टर वसिम खान म्हणाले, “ओह माय घोस्ट’ हा हॉरर चित्रपट असून त्याला विनोदाची फोडणी आहे. लेखक मोहसीन चावडा यांनी अत्यंत सुंदररीत्या या चित्रपटाची कथा लिहिली असून यातील कलाकारांनी सुंदररीत्या या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. चित्रपटाच्या टीझरला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मला पूर्ण खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल. कोविडची टाळेबंदी सुरु असताना आम्ही चित्रपटाची तयारी केली आणि सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यावर आता आम्ही प्रेक्षकांसमोर येत आहोत.”जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान व रोहनदीप सिंग यांनी केली आहे.  या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉरर कॉमेडी टाइपचा हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!