रोबोसर्च या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्र संपन्न

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :जनरल प्रॅक्टिशनरस असोसिएशन (जी पी ए) कोल्हापूर व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोबो सर्च या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी हॉटेल सयाजी येथे चर्चासत्र झाले.पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक तसेच कोकण, गोवा इत्यादी भागांमध्ये प्रसिद्ध असणारे कोल्हापुर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वप्रथम सुरू करण्यात आलेले आहे या तंत्रज्ञानाद्वारे ज्या ज्या ठिकाणी एखाद्या तज्ञ सर्जन चा हात पोहोचू शकत नाही अशा अवयवांच्या ठिकाणीसुद्धा पाच मिलिमीटर इतक्या सूक्ष्म दुर्बिनी व यंत्राद्वारे ऑपरेशन करणे सहजगत्या शक्य झालेले आहे. या ऑपरेशनमध्ये झिरो ब्लड लॉस ही संकल्पना सुद्धा विकसित करण्यात आलेली आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा व हे तंत्रज्ञान कशाप्रकारे किफायतशीर आहे याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन या चर्चासत्र करण्यात आले. यावेळी जीपीए चे अध्यक्ष
डॉ शिरीष पाटील, सचिव डॉ, अरुण धुमाळे, खजानिस डॉ. महादेव जोगदंडे,डॉ. विनायक शिंदे सर्व संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संस्थापक डॉ. सुरज पवार, डॉ.रेश्मा पवार, डॉ संदीप पाटील व तज्ञ डॉक्टर वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!