
कोल्हापूर :१७. करवीर तालुक्यातील म्हारूळ येथील दूध संस्था कर्मचा-यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्द गोकुळ परिवारातर्फे गावातील दूध संस्था कर्मचा-यांचा तसेच संघाचे लिंगनूर सेंटरचे सिनी.विस्तार सुपरवायझर श्री.वसंतराव बाबूराव घुरे हे संघाच्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल व केनवडेचे कृष्णात ज्ञानदेव पाटील यांनी अत्यंत गरीब परिस्थीती असताना देखील चार्टर्ड अकौंट परिक्षेत यश मिळवले बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके म्हणाले की, म्हारुळ गावातील सर्व दूध संस्था कर्मचा-यांनी एकञ येवून ग्रामपंचात बिनविरोध केली ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून या कर्मचा-यांनी जिल्हामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर संघाच्या सर्व सेवा-सुविधा उत्पादकापर्यंत पोहोचविण्याचे काम हे कर्मच्यारी करीत असतात. त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे व जिल्ह्यातील इतर संस्थांनी त्याचा आदर्श घ्यावा म्हणून संचालक मंडळ सभेमध्ये सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत म्हारूळ या गावातील सर्व दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके,रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील (आबाजी), अरूण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वासजाधव, संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील, उदय पाटील पाटील, बाळासो खाडे, सत्यजीत पाटील, विलास कांबळे, संचालीका , सौ.अनुराधा पाटील, विजय उर्फ बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील दूध संस्था प्रतिनिधी, कर्मचा-यांसह इतर उपस्थित होते.
Leave a Reply