
कोल्हापूर: वाढीव विजबिलांमुळे वीज ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. परंतु महावितरण कार्यालयाकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. वाढीव विजबिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. हा प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने अशा प्रकारचा तगादा लावून वीज तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. महावितरण कार्यालयाकडून अशा प्रकारची कारवाई त्वरित बंद करावी अन्यथा महावितरणचे जे अधिकारी व कर्मचारी वीज तोडणी करतील त्यांच्या घरासमोर बोंबा-बोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता मासाळ यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, विशाल वाठारे, महेश घोलपे, दिलीप पाटील, बाबुराव बाजारी, रमेश गावडे, प्रकाश हर्णे, कृष्णात सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Leave a Reply