कोल्हापूरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे:बाजीराव खाडे

 

कोल्‍हापूर :जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आधार दिला असे उद्गार सत्कारमूर्ती बाजीराव खाडे यांनी काढले.कॉंग्रेसचे उत्तरप्रदेश प्रभारी व महाराष्‍ट्र कॉंग्रेसच्‍या पार्लमेंटरी बोर्डाच्‍या सदस्‍य पदी निवड झाल्‍याबद्दल बाजीराव नानू खाडे सांगरुळ, ता.करवीर यांचा गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी भात पिक स्‍पर्धेमध्‍ये राज्‍यात प्रथम क्रमांक पटकाविल्‍याबद्दल श्री. मलगोंडा सातगोंडा टेळे, सुळकुड, ता. कागल, तसेच इंटरनॅशनल शुटींग स्‍पोर्ट्स फेडरेशन आयोजित वर्ल्‍ड कपसाठी दिल्‍ली येथे निवड झाल्‍याबद्दल स्वप्‍नील सुरेश कुसाळे, कांबळवाडी, ता. राधानगरी यांचा देखील गोकुळच्यावतीने सत्‍कार करणेत आला.यावेळी चेअरमन रविंद्र आपटे,माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके,रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील (आबाजी), अरूण डोंगळे,जेष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील,पी.डी.धुंदरे, उदय पाटील, अमरिशसिंह घाटगे, सत्‍यजीत पाटील, विलास कांबळे, संचालीका अनुराधा पाटील, विजय उर्फ बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!