
कोल्हापूर: येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या घाटी दरवाजा येथील इमारतीचे नूतनीकरण उपाध्यक्ष जितेंद्र राठोड व सभासद मुरलीधर गणपत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.सराफ व्यापारी संघाची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराशेजारी घाटी दरवाजा येथे इमारत आहे. येथे सोने-चांदी टंच विभाग आहे. काळानुरूप संस्थेचे नूतनीकरण गरजेचे झाल्याने ते करण्यात येत आहे.श्री. पोतदार यांच्या हस्ते संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), रवींद्र राठोड, संचालक शिवाजी पाटील, ललित गांधी, तेजस धडाम, प्रीतम ओसवाल, किशोर परमार, प्रसाद कालेकर, विक्रम कुलकर्णी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
Leave a Reply