
कोल्हापूर: मोदी सरकारने संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली राज्यव्यापी उपोषण सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फेही उपोषण करण्यात आले. यावेळी, पक्ष निरीक्षक मा.आ. शिरीष चौधरीजी, आमदार प्रा. जयंत आसगवकर, गुलाबराव घोरपडे, काँगेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऍड. सुरेश कुऱ्हाडे, दिलीप पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडे, चंदा बेलेकर, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने, सचिव संजय वाईकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Leave a Reply