
कोल्हापूर: येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या 30 पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या.
गेली दहा वर्षे दीपक पोलादे हे पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी देत असून पंचगंगा स्मशानभूमीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख गावांनाही त्यांनी पिंडी दिल्या आहेत. प्रदुषणमुक्तीचा निर्धार जोपासून दीपक पोलादे यांनी एक मुठ रक्षा, पर्यावरण जोपासुया- गॅस दाहिनीचे स्वागत करुया,स्वच्छ, सुंदर स्मशानभूमी अशा जनजागृतीवरही त्यांचा सर्वाधिक भर आहे.
Leave a Reply