विशाळगडसंदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे खा.संभाजीराजे यांचे आदेश

 

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून तात्काळ पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश छत्रपती संभाजीराजे दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना यांनी १ एप्रिल या दिवशी निवेदन देऊन सदरचा विषय अवगत केला. तेव्हा हे आदेश त्यांनी दिले. या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत बराले, राजू यादव, शरद माळी, बाबासाहेब भोपळे, श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
काही थोड्याच वर्षांच्या कालावधीत विशाळगडावर ६४ अतिक्रमणे झाल्याचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘तुम्ही या विषयाचा चांगला अभ्यास केला आहे. काही दिवसांपूर्वी मी विशाळगड येथे भेट दिली होती तेव्हा तेथे पुष्कळ अस्वच्छता होती. या प्रकरणी मी स्वत: लक्ष घालीन.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!