विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये;खा.संभाजीराजे छत्रपती

 

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांस अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये तसेच यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आज विद्यापीठात विशेष बैठक झाली. या बैठकीत बी.ए. व एम.ए. इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमांबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या अभ्यासक्रमात महाराणी ताराबाई राणीसाहेब, कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई साहेब, क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराज तसेच करवीर राज्याचा इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.वेगवेगळ्या प्रकाशनांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांना अधिकृतपणे प्रमाणित करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने तज्ञ समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीकडून प्रमाणित झाल्यानंतरच प्रकाशकांना पाठ्यपुस्तक वितरीत करता येईल. याचबरोबर, विद्यापीठाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबत ही बैठकीत चर्चा झाली.या बैठकीस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जेष्ठ इतिहास संंशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास विभागप्रमुख अवनिश पाटील यांचेसह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव व राहूल शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!