
कोल्हापूर: नोहेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रामध्ये मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यानंतरच महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विनयभंग, बलात्कार, खून यासारखे विविध गुन्हे राजरोसपणे महाराष्ट्रात घडू लागले व विरोधी पक्षाने तसेच जनतेचा रोष वाढल्यावर यातील आरोपींना पकडण्यासाठी ज्या पद्धतीने हालचाली घडत आहेत त्या शरमेने मान खाली घालण्या सारख्याच आहेत. भारतीय जनता पार्टी कोहापूर महानगर महिला आघाडीच्या वतीने नैतिकता गमावून बसलेल्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध याद्वारे करीत आहोत.यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक व्ही.सी बेन यांना आज महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या, वन विभागामध्ये काम करणाऱ्या दिपाली चव्हाण या कर्मचारीने उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. दिपाली चव्हाण यांच्यावर सातत्याने विनोद शिवकुमारच्या माध्यमातून अत्याचार व दबाव वाढत असताना त्यांनी आपल्या वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती, परंतु वरिष्ठांनी याकडे कानाडोळा केल्यामुळे दिपाली चव्हाण यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. इतके होऊनही विनोद शिवकुमार याला निलंबित करण्यासाठी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बराच वेळ घेतला यामागचे गौडबंगाल काय याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे?
Leave a Reply