
कोल्हपूर : सीसीग्मा लाईफस्टाईल यांना, त्यांच्या लोकप्रिय किफायतशीर लक्झरी हेअर ब्रॅण्ड केटी प्रोफेशनलचे तसेच सलून व्यावसायिकांसाठी २०२१ मध्ये व्यवसायाच्या नव्या युगामध्ये आशादायक, सामर्थ्यवान आणि शैलीदार प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या नव्या मोहिमेचे, प्रवक्ते म्हणून, भारतातील हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या नावाची घोषणा करताना आनंद होत आहे.जावेद हबीब यांच्या आजचा मास्टर क्लास, मुख्यत: केराटीन, सिस्टीन आणि बोटोक्स हेअर सर्व्हिसेससह केशकर्तनाचे अतिरिक्त नवीन तंत्र यावर केंद्रित असेल. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे केसगळती कमी करणे आणि केसांच्या वाढीसाठी पोषक अशा आवश्यक तेलासह, केटी आज आपल्या ‘सेंद्रिय कांदा शॅम्पू, कंडिशनर आणि सिरम’चा शुभारंभ करीत आहे. या सेंद्रिय कांदा शैम्पू आणि कंडिशनरमध्ये, कांदा आणि कोरफडीच्या अर्काचे उत्तम मिश्रण असून त्याने केस गळती थांबून केस मजबूत होण्याबरोबरच केस मुलायम देखील होतात. केसांची वाढ, केस गळतीवर नियंत्रण आणि केसातील कोडा दूर करण्यासाठी हे सेंद्रीय कांदा सीरम अतिशय आदर्श आहे. याचबरोबर केवळ 3 आठवड्यांत यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि केस तुटणे याला आळा बसतो आणि मजबूत, निरोगी आणि दाट केसांच्या पुनरुत्पादनास यामुळे प्रोत्साहन मिळते.“दर २०० कि. मी.वर भारतातील पाणी आणि हवामान बदलते आणि तसेच भारतीय लोकांच्या केसांचे प्रकारदेखील बदलतात” असे सीसिग्मा लाइफस्टाईलचे व्यवस्थापकीय संचालक – ध्रुव सयानी यांनी सांगितले.भारतीय जनतेला सेवा पुरविणे आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण तसेच सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने याद्वारे बदल घडविणे या सामायिक दृष्टीकोनासाठी भारतातील हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या बरोबर काम करताना सीसिग्मा लाईफस्टाईल यांना अतिशय आनंद होत आहे. जावेद हबीब ही संपूर्ण भारतात जोमाने कार्यरत असणारी आणि सर्वसामान्यांपर्यंत सेवा उपलब्ध करून देणारी 900हून अधिक सलूनची सर्वात मोठी शृंखला आहे.जावेद हबीब यांच्यापेक्षा भारतीय केश विज्ञान दुसर्या कोणालाही अवगत नाही”, असे ध्रुव सयानी म्हणाले.आतापर्यंत कधीही बघण्यात न आलेली अत्यंत दर्जेदार हेअर केअर उत्पादने घेऊन येणार्या केहेअरथेरपी प्रोफेशनलची, सीसिग्मा लाईफस्टाईल प्रा. लि. तर्फे 2016 साली भारतात सुरूवात करण्यात आली. सध्या 27 राज्यांमध्ये, 86 पेक्षा जास्त शहरांमधील समाधानी ग्राहक आणि 15,500 पेक्षा जास्त सलूनमधील केटी उत्पादनप्रेमींच्या माध्यमातून केटी प्रोफेशनलची उपस्थिती जाणवते.कोणत्याही प्रकारच्या केसांसाठी आम्ही, सर्व प्रकारच्या केसांसाठी सलूनमधील सेवांसाठी विस्तृत उत्पादनांसह आणि अधिक सेवोत्तर देखभालीसाठीच्या उत्पादनांसह, सर्वंकष समाधान प्रदान करतो
Leave a Reply