
रायगड : प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी, पुरातत्त्व विभागाने केलेल्या या कामगिरीबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
Leave a Reply