नवोदित व स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध; दिनेश माळी फाउंडेशनचा ‘म्युझिकल युवर्स’ हा स्तुत्य उपक्रम

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: प्रदिर्घ कालावधी नंतर पुनःपदार्पण करत कोल्हापुरात गेली सात वर्षे सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत दिनेश माळी फाउंडेशनच्या वतीने ‘म्युझिकल युवर्स’ हे संगीतप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दर्जेदार संगीताच्या प्रसार व प्रचारासाठी दोन वर्षांपूर्वी या ‘म्युझिकल यूजर्स’ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली. या अंतर्गत कराओके व विविध वाद्यांचे, गायनाचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संगीत क्षेत्राची आवड असणाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून अनेक दर्जेदार गायक व गायिका तसेच वादक तयार झालेले आहेत व होत आहेत. दोन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या सर्व संगीतप्रेमींना सदाबहार कार्यक्रमातून संधीही देण्यात आली आहे,असे दिनेश माळी फाऊंडेशनचे दिनेश माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विरासत फाऊंडेशनचे या संपूर्ण उपक्रमास सहकार्य लाभले आहे असे प्रसाद जमदग्नी यांनी सांगितले.
दिनेश माळी पुढे म्हणाले ‘जिंदगी का सफर’, ‘लीजेंडरी किशोर विथ सेवन लिजेन्ट्स’, रूद -ए -गझल,’जिंदगी मिल के बितायेंगे’, शाम-ए- गुलजार, किशोर के रंग मुकेश के संग ,मेलिडियस ऋषी, ‘इटर्नल आर.डी’,व्हॅलेंटाईन डे रोमँटिक ड्युएटस, किशोर नेव्हर बिफोर,मदहोशी ड्युएट थीम,आणि इसेन्शियल किशोर ,माहताब -ए-गझल अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमातून या स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. तिसर्‍या वर्षात पदार्पणाचे औचित्य साधून आता याची व्याप्ती वाढविण्याचा मानस असून नवोदित व स्थानिक संगीतप्रेमींसाठी दर्जेदार सांगितिक प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्याची ही नामी संधी आहे. त्याचप्रमाणे संगीत सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने मिरजकर तिकटी येथील अंधशाळा, करूणालय संस्था, महाराष्ट्र टाईम्सच्या ‘बळ द्या पंखांना’ अंतर्गत दोन विद्यार्थी दत्तक घेतले असून स्वयम् संस्थेतील चार मुलांच्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली आहे. तसेच पन्हाळा येथील दिलीपसिंह घाटगे, बालग्रामलाही मोलाची मदत केली आहे तरी आपल्या सुप्त इच्छा व कलागुणांना वाव देण्यासाठी मातोश्री प्लाझा, दुसरा मजला, व्हिनस कॉर्नर येथे किंवा दिनेश माळी 98 50 58 76 62, योगिनी खानोलकर 91 58 05 91 60
मुकुंद वेल्हाळ 93 70 28 32 55 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
विरासत फाउंडेशन ने कोरोना काळात ऑनलाइन अभिनय स्पर्धा घेतली तसेच प्रत्येक रविवारी कोल्हापुरातील असे लोक जे बाहेर वेगवेगळ्या क्षत्रात उत्तम काम करत आहेत पण त्याची कल्पना कोल्हापुरातील लोकांना नसते. अश्याच लोकांच्या मुलाखतीचा उत्तम कार्यक्रम विरासत फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून चालू केला
आज पर्यंत 19 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत
तसेच कोल्हापुर सिंगिंग आयडॉल जाहीर केली आणि आज ती अंतिम टप्प्यात पोचली आहे.
पत्रकार परिषदेस दिनेश माळी फाऊंडेशनच्या अंजली चोडणकर, मुकुंद वेल्हाळ,विरासत फाउंडेशनचे मीना ताशीलदार, शिल्पा पुसाळकर,गिरीश बारटक्के, रणजित बुगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!