श्री अंबाबाई,जोतिबासह सर्व मंदिरे आजपासून दर्शनासाठी बंद

 

कोल्हापूर: राज्य शासनाच्या आदेशानुसार
श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थानसह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणारी सर्व मंदिरे ५ ते ३० एप्रिल या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सवही रहित करण्यात आला असून केवळ नैमित्तिक पूजा-अर्चा चालू असणार आहे. याचसमवेत अखंड महाराष्ट्रातून ज्यासाठी भाविक येतात ती जोतिबा देवाची यात्राही रहित करण्यात आल्याचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!