
कोल्हापूर :जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस रक्तदान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सद्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.त्याबरोबर ‘ मी मास्क वापरतोय, तुम्हीसुद्धा वापरा ‘ या अभियानांतर्गत गरजूंना १लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे. १२ एप्रिल पासून अजिंक्यतारा कार्यालय येथे वह्या संकलन सुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती नामदार सतेज पाटील वाढदिवस समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आमदार सतेज पाटील हे आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी शुभेच्छाच्या स्वरूपात वह्या स्वीकारून साजरा करतात. २००७ सालापासून सुरू केलेल्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४ लाख विद्यार्थ्यांना ६५ लाख वह्या वाटप केल्या आहेत.
यंदा कोरोनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्यक्ष शुभेच्छा स्विकारणार नाहीत .
पण त्यांचा वाढदिवस हा शासनाच्या नियमांचे पालन करून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
सध्या रक्त पेढ्या मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान केले होते . हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी १२ एप्रिलपासून कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याबरोबरच मास्क वापरण्याबाबत जन जागृती करण्यात येणार आहे. भाजीपाला, फळे विक्रेते, रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक अशा गरजूंना १ लाख मास्क चे वाटप करण्यात येणार आहे.
Leave a Reply