“मल्‍टीस्‍टेट” पालकमंञ्यांचा शिळ्या कढीला ऊत: चेअरमन रविंद्र आपटे

 

कोल्‍हापूरः गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महा‍देवराव महाडिक यांनी यापूर्वीच गोकुळ मल्‍टीस्‍टेटचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे.परंतु कालबाह्य झालेला विषय पुन्‍हा उकरुन काढून पालकमंञी गोकुळच्‍या सभासदांची दिशाभुल करीत आहेत. असा पलटवार गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी केला आहे. प्रसिध्‍दी पञकातुन त्‍यांनी पालकमंञ्यांच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेतला आहे.पञकात पुढे म्‍हटले आहे की गोकुळच्‍या सर्वसाधारण सभेत मल्‍टीस्‍टेट हा विषय रद्द केला तो गोकुळचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक साहेब यांच्‍या सुचनेवरुनच सभासदांच्‍या अडचणींचा जो विषय असेल तो आम्‍ही घेणार नाही व यापुर्वीही घेतलेला नाही. ज्‍यांनी मल्‍टीस्‍टेटचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला ते स्‍वतः त्‍यांच्‍या सोबत आहेत. गोकुळ हा शेतक-यांच्‍या मालकीचा असून शेतक-यांच्‍या हिताचेच निर्णय गोकुळमध्‍ये घेतले जातात. शेतक-यांना आणखी जादा दर देता यावा यासाठीच संघ मल्‍टीस्‍टेट करण्‍याचा मुद्दा पुढे आला होता आता तो मागे पडला आहे. पण विरोधक शिळ्या कढीला ऊत आणत आहेत सभासदांनी त्‍यांची वक्‍तव्‍य गांभीर्याने घेवू नये.ज्‍यांच्‍या संस्‍था मल्‍टीस्‍टेट आहेत तेच गोकुळच्‍या विरोधात बोलत आहेत हे हस्‍यास्‍पद आहे असा आरोप चेअरमन रविंद्र आपटे यांनी पञकात केला आहे. मंडलिक कारखाना मल्‍टीस्‍टेट, वारणा दूध संघ मल्‍टीस्‍टेट, संताजी घोरपडे खाजगी, बंद पडलेला महालक्ष्‍मी दूध संघ मल्‍टीस्‍टेट अशा  नेत्‍यांना गोकुळवर बोलण्‍याचा नैतिक अधिकार नाही. सर्व सामान्‍य सभासदांना आम्‍ही चांगल्‍या कारभाराचा विश्‍वास दिला आहे. ते आमच्‍या सोबत आहेत असा विश्‍वास त्‍यांनी पञकातुन व्‍यक्‍त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!