कोरोनाशी लढण्यासाठी सिद्धगिरी कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी समर्पित : अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

 

कोल्हापूर: सिद्दगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर कणेरी मठ  येथे २१ एप्रिल रोजी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कोविड केअर युनिट २ ची सुरुवात कृषी निवासस्थानच्या इमारतीमध्ये प.पू.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजीं यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली ”रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या ब्रीद वाक्याने सर्वसामान्य गरजू लोकांना अगदी माफक दरामध्ये कोरोना रोगावरील उपचार मिळावेत व गरजू लोकांची सेवा घडावी ह्या उद्देशाने कोविड युनिट २ ची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना आजाराने अक्षरशा हाहाकार माजवला आहे. अशा ह्या महामारीशी दोनहात करण्यासाठी समर्पित कोविड केअर सेंटर सुरु करून कोरोना महामारीला चित करण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांना ह्या आजाराबद्दल उपचार मिळावेत ह्या उद्धेशाने ह्या कोविड युनिटची सुरुवात केली गेली आहे. *ह्या कोरोना युनिटमध्ये १०० बेडसह ३० ऑक्सिजनयुक्त बेड व १० बेड व्हेंटिलेटरची सुविधा असणारे सुसज्ज असे कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे.* त्याचबरोबर कोरोना आजारावरील उत्तम दर्जाची उपचारपद्धतीसुद्धा अगदी माफक दरामध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्वाची बाब अशी कि नियमित कार्यरत असे सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर ही मुख्य इमारत इतर रोगांवरील रुग्णांसाठी कार्यरत असणार आहे.
ह्या सिद्धगिरी समर्पित कोविड केअर सेन्टरच्या उद्घाटनप्रसंगी प.पू.श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, श्री.मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी,सिद्दगिरी हॉस्पिटलचे डॉ.शिवशंकर मरजक्के(न्यूरोसर्जन),डॉ.रेशम रजपूत(वैद्यकीय अधिक्षक),डॉ.प्रकाश भरमगौडर(इंटेनसिव्हिस्ट/भुलतज्ञ),डॉ.सौरभ भिरूड(जनरल मेडिसिन/फिजिशियन)डॉ.तनिष पाटील(अस्थिरोग तज्ञ),डॉ.नीता मोरे(रेडीओलोजीस्ट)डॉ.सचिन पाटील(एम.डी.आयुर्वेदा)डॉ.जितेंद्र रजपूत(स्त्रीरोगतज्ञ) ऍडव्होकेट एम् डी पाटील,गुरुकुलचे प्रल्हाद जाधव तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,जनसंपर्क अधिकारी प्रविण सुतार व सिद्धगिरी परिवारातील सर्व सदस्य व भक्तगण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!