
कोल्हापूर: शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ( cpr )ला भेट देण्यात आली.यावेळीं अधिष्ठाता डॉ. मोरे यांना काही सूचना करण्यात आल्या.
सीपीआरमधील कोरोना लसीकरण विभाग दुसऱ्या मजल्यावर आहे तो तिथून हटवून खाली तळ मजल्यावर घेण्यात यावा, जेणे करून वयस्कर जेष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, व पहिल्यांदा लस जेष्ठ नागरिकांना देण्यात यावी , तसेच कोरोना टेस्ट ची वेळ दुपारी 2 पर्यत होती, ती वाढवून रात्री 9 पर्यंत करण्यात यावी.वरील सर्व मागण्या डॉ. अधिष्ठाता मोरे यांनी मान्य करून उद्या पासून या सर्व गोष्टींची अमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी सुजित चव्हाण, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव आदी उपस्थित होते.
Leave a Reply