
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या गंभीर बाब असून, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. रुग्णसेवेस गती देण्यासाठी शहरात दसरा चौक येथे मध्यवर्ती तपासणी केंद्र आणि टेंबलाईवाडी येथील आय.आर.बी.कंपनीच्या इमारतीमध्ये जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या. शहरातील वाढता संसर्ग आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात कोल्हापूर महानगरपालिका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Leave a Reply