
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून ४० लाख रुपयांचा निधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) दिला.
राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) आमदार जाधव यांच्याकडे एनआयव्ही बीआय पॅप मशीन, मल्टी पॅरा मॉनिटर्स (5 पॅरा), व्हिडिओ लॅरिनोस्कोप, व्हेंटिलेटर सर्किट व बनीस सर्किट आदी वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. या साहित्य खरेदीसाठी आमदार जाधव यांनी आमदार निधीतून ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयास (सीपीआर) दिला.
Leave a Reply