खोटा जबाब देणेसाठी पोलिसांनी केली अमानुष मारहाण व इतर अन्याया विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडून न्याय मिळावा :राकेश व रोहित रेंदाळकर यांची मागणी

 

कोल्हापूर : खोटा जबाब देणेसाठी दबाव आणून सुभाषनगर पोलिस चौकीसह राजारामपुरी पोलिस स्थानकात धमकीसह अर्वाच्य शिवीगाळ व मारहाण करत माझे शारिरीक व मानसिक खच्चीकरण करणारे राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांच्या विरोधात आपण वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचेकडे दाद मागितली असून त्यांनी त्याची योग्य दखल घेतली आहे. व त्याची नोंदही घेतली आहे. तरी आपणांस यथायोग्य न्याय मिळावा अशी मागणी राकेश रेंदाळकर यांनी केली आहे. या संदभात त्यांनी स्वत : दिलेली माहिती अशी:
शिवाजी उद्यमनगर येथे राहणारा राकेश रेंदाळकर हा पृथ्वी सप्लायर्स मध्ये सुपरवायझर पदावर काम करतो. दिनांक 13 मे रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान माझ्या घराजवळून तीन पोलिसांनी मला माझ्या गाडीवर बसवून सुभाषनगर येथील पोलिस चौकीत नेवून डांबून ठेवले व तेथे शिव्या देत लाथा बुक्यांनी प्रचंड मारहाण केली. तेथून मला राजारामपुरी पोलिस स्थानकात घेवून गेले. पोलिस महेश पोवार, सुरेश काळे आणि आणखीन एक पोलिसाने खोटा जबाब दे म्हणून माझ्यावर दबाव आणला. मी ठाम नकार दिल्यावर त्यांनी मला पोलिस अधिकारी सिताराम डुबल यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष नेले, तेंव्हा त्यांनी हा खोटा कबुली जबाब देत नसल्यास याची चमडी सोला, मारून टाकला तरी चालेल “असे सांगितल्यावर महेश पोवार, सुरेश काळे व एक पोलिस यांनी मला पट्टयांनी व लाथांनी मारहाण केली. या अनपेक्षित मारहाणीने मी घाबरून गेलो. त्यानंतर त्यांनी मला पोलिसांच्या बोलेरो गाडीमधून सुमेध भोसले याच्या उमा टॉकीज जवळील घरी घेवून गेले. तो घरी नसल्याचे समजल्यावर परत तेथून मला राजारामपुरी पोलिस स्थानकात घेवून आले व तेथून मला राकेश नागदेव याच्या दुकानाजवळ घेवून गेले. त्याचे दुकान बंद होते व तो तेथे नव्हता. तेथेच मला गालावर जोरदार ठोसा मारला. पाच वर्षांपूर्वी माझे जबड्याचे ऑपरेशन झाले असल्याने मला अत्यंत जिवघेण्या वेदना झाल्या. यानंतर मला घरी सोडण्यात आले.या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तुला मोक्का सारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकवू शकतो असे धमकीवजा सांगून ते निघून गेले. या प्रचंड अनपेक्षित मारहाणीमुळे मी घाबरून घरी बसून राहिलो. थोड्या वेळानंतर मला माझ्या घरच्यांनी विश्वासात घेतल्यानंतर मी माझ्या चुलत भावासमवेत सेवा रूग्णालय येथे जावून वैद्यकीय उपचार घेतले. या प्रकरणाची मी लेखी तक्रार अर्ज राजारामपुरी पोलिस स्थानकात केली होती. दिनांक 14 मे रोजी मी केलेल्या तक्रार अर्जाबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक बी.बी. शिंदे हे माझ्या घरी येवून माझ्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे.लवकरच आपणांस बोलवले जाईल असे सांगितले. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडेसुध्दा लेखी तक्रार केली असता त्यांनी पोलिस उपअधिक्षक आर.आर. पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत . आमचा त्यांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. याची रितसर फिर्याद नोंदवून समद न्याय मिळावा आणि मला व माझ्या कुटूंबियांना मानसिक तणावातून मोकळे करावे अशी आपली रास्त अपेक्षा राकेश रेंदाळकरांनी व्यक्त केली आहे. याच बरोबरीने रोहित रेंदाळकर यांनी दिलेली माहीती अशी- भागीदार असलेल्या कंदलगाव येथील कॅफे पनामा दि स्पोर्टस लाऊंज या सध्या लॉकडाऊन काळात बंद असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी बेकायदेशिरपणे गेटवरून उड्या मारून व आतील शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये शिरकाव केला होता. त्याचे सर्व सी.सी.टी.व्ही फुटेजही उपलब्ध आहे. या विरोधातही स्थानिक व जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या दोन व इतर अनेक बेकायदेशिर कारभारामुळे पोलिसांविषयी सामान्यांमध्ये नाहकपणे दहशत निर्माण होत आहे. तसेच राजारामपुरी परिसरातील व्यापारी, उद्योजक हे अत्यंत मानसिक तणावात जगत आहेत. या अन्याया विरोधात कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी युध्द पातळीवर लक्ष घालून या दोन्ही घटनांची रितसर फिर्याद नोंद करून आम्हास न्याय देतील.यासाठी आम्ही प्रचंड आशावादी असून लोकशाही मार्गाने लोकप्रतिनीधींपासून ते न्यायालयापर्यंत दाद मागणार आहोत. कोल्हापूरची स्वाभीमानी जनता यामध्ये आमच्या बाजून उभी राहील असा ठाम विश्वास राकेश आणि रोहित रेंदाळकर बंधूंनी व्यक्त केला आहे. “ पावसाने झोडपले आणि राजाने बदडले , तर दाद कुठे बघायची “अश्या हतबल परिस्थितीत आम्ही आहोत. मात्र वरिष्ठ अधिकारी आमच्या अन्यायावर योग्य ती दखल घेतील असा विश्वासही राकेश आणि रोहित रेंदाळकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!