
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ गोकुळच्या चेअरमन पदी विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार रयत संघाचे चेअरमन निमगोडा पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना रयत संघाचे चेअरमन निमगोडा पाटील म्हणाले गोकुळच्या माध्यमातून गेली ३०ते ३५ वर्षे सर्वसामान्य दूध उत्पादकांसाठी कार्यरत असणारे नेतृत्व म्हणून विश्वास नारायण पाटील (आबाजी) सुपरिचित आहेत. हसतमुख, मितभाषी, संयमी, निगर्वी व्यक्तिमत्व असे विविध पैलू आदरणीय आबाजींच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात. तसेच गोकुळच्या निवडणुकी मध्ये रयत संघाचे सर्व संचालक व संस्थेचे सभासद आबाजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.आबाजीचे नेतृत्व कै. बोंद्रे दादा, कै. एस. आर. पाटील यांच्या जडणघडणमध्ये झाले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी यांच्याकडे आहे.आबाजीचा नेतृत्वाखाली गोकुळ प्रमाणे रयत संघाचा ही नावलौकिक वाढला आहे. गावपातळीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा असणारा सततचा जनसंपर्क हा नेहमीचाच चर्चेचा विषय गोकुळच्या कार्यक्षेत्रात सुख-दुःखांची कोणतीही घटना होऊदेत तेथे आबाजींची उपस्थिती निश्चितच अग्रक्रमाने असते. या त्यांच्या सततच्या जनसंपर्काचा अनुभव परिसरातील दूध उत्पादकांना आला.असे गौरव उद्गार रयत संघाचे संचालक शिवाजी देसाई यांनी काढले.यावेळी रयतचे संचालक सचिन पाटील, कुंडलिक पाटील, सुभाष चौगले,चिंतामण गुरव, शिवाजी देसाई, दशरथ पाटील, दत्तात्रय हराळे, आनंदराव तिवले, विलास पाटील,शिवाजी भोसले, संचालिका माधुरी जाधव,निर्मला निगडे, व्यवस्थापक तानाजी निगडे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply