मोदी सरकार फक्त इव्हेंट आणि इमेज मॅनेजमेंट करण्यात मग्न: काँग्रेसचा घणाघात

 

कोल्हापूर: मोदी सरकार फक्त इव्हेंट मॅनेजमेंट आणि इमेज मॅनेजमेंट करण्यात मग्न आहे नोटाबंदी शेती व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे व जागतिक निर्देशांकात भारताचे घसरलेले स्थान कोरोना लसीचा तुटवडा अर्थव्यवस्थेचे नुकसान वस्तुस्थिती यामुळे समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी मोदी सरकारला सहा वर्षे लागली. तरी त्यात अजूनही कोणतीही स्पष्टता नाही. शेतकरी, सामान्य लोक, विद्यार्थी, गरीब लोक हे महागाईने त्रस्त आहेत. पेट्रोल ने शंभरी पार केले. खाद्य तेलाचे दर वाढले. पण हे सरकार मात्र स्वतःची इमेज जपण्यात मग्न आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळली कमी झाली हे त्यांनी स्वतः सांगावे, अशी घणाघाती टीका आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी केली आज मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली मोदी सरकार चालवण्यात संपूर्णतः अपयशी ठरले. या विरोधात आज जिल्हा काँग्रेस कमिटी येथे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व नेते आमदार पदाधिकारी यांनी मोदी सरकारचा निषेध केला.

अर्थव्यवस्थेतील काळा पैसा वसूल करणे,भ्रष्टाचार कमी करणे, बनावट पैसा नष्ट करणे, दहशतवाद आणि नक्षलवाद कमी करणे अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम कमी करणे अशी उद्दिष्टे सांगत कोणतीही चर्चा न करता मोदी सरकारने अचानक नोटाबंदी केली. पण यापैकी कोणतेही उद्दिष्ट साध्य झाले नाही. उलट शेती उद्योग धंदे व संघटित क्षेत्र डबघाईला आले अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जीडीपी मध्ये दोन टक्‍क्‍यांनी घट झालेली आहे. बँकांच्या रांगेत उभा राहून शंभरच्यावर सामान्य माणसे मृत्युमुखी पडली
शेतकरी कायदे पारित करताना संसदेमध्ये चर्चा करण्यात आली नाही. शेतकरी संघटनांनी कोणतीही मागणी न करता हे कायदे केले आहेत कोणते आणीबाणीची स्थिती नसताना आधी अध्यादेशाच्या स्वरूपात हे कायदे आणले गेले. संसदीय समिती पुढे ठेवण्यात आले नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला बदनाम करणे, शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणे यामुळे शेतकरी आजही मोदी सरकारच्या विरोधात उभे आहेत. कोणतेही तयारी नसताना घाईघाईने संसदेत गाजावाजा करून जीएसटी आणला गेला. यामध्ये यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. जीएसटी वसूल केल्याने उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक लोकशाही निर्देशांक जगातील 167 देशांमध्ये 2014 मध्ये 27 व्या स्थानावर असणारा भारत देश आज 2020 मध्ये 53 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
जगातील सर्वाधिक इंटरनेट सेवा मागील वर्षी भारतामध्ये बंद झाली आहे. जेव्हा राहुल गांधी मोदी सरकारला वारंवार कोरोनाच्या संकटाचा इशारा देत होते तेव्हा मोदी सरकार नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात व्यस्त होते. या कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याऐवजी थाळ्या, टाळ्या आणि दिवे लावणे असे इव्हेंट मोदी सरकारने केले. सुरुवातीला वारंवार लॉकडाऊनमध्ये जनतेसमोर येऊन भाषण करणारे मोदी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर राज्य सरकारांवर जबाबदारी टाकून जनतेसमोर येईनासे झाले. कोरोनाची संख्या वाढत असतानाही ते बेफिकीर राहिले. कोणती पूर्वतयारी न केल्याने देशभर ऑक्सिजनची व रेमेडिसीवरसारख्या औषधांची कमतरता निर्माण झाली. आज ऑक्सिजनअभावी हजारो लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. गंगेत तरंगणारे मृतदेह बघता भारतातील लोक आपल्या जवळच्या लोकांचे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार देखील करू शकले नाहीत. लसीकरणामध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. देशातील लहान-मोठ्या राज्यांना लस मिळवण्यासाठी जगातील मोठ्या देशांची स्पर्धा करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेल खाद्यतेलाचे भाव लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. किमतीत वाढ झाल्याने शेतीचे गणित बिघडले आहे. मालवाहतूक दिवसेंदिवस महाग होत आहे. कोणतेही ठोस नियोजन नसताना जगातील सर्वात कडक लॉकडॉऊन लावून अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले. बेरोजगारीचा दर आज मागील तीस वर्षात सर्वाधिक आहे. कोरनानंतर आपली अर्थव्यवस्था सर्व रिकव्हर करेल असे जरी सरकार सांगत असले तरी मोदी सरकारच्या धोरणामुळे आज हे शक्य नाही. गरीब लोक अधिक गरीब होतील आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतील आणि समाजातील आर्थिक विषमता अधिकच वाढत जाईल. आज भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेश पेक्षाही कमी आहे. ज्ञानी व तज्ञ लोक यांची अवहेलना करत असल्यामुळे त्यांनी त्या त्या वेळी राजीनामे दिले आहेत. असेही पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले.या आंदोलनात आमदार पी. एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव,
आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लाणी , सचिन चव्हाण, किशोर खानविलकर,संपतराव पाटील, दिपक थोरात,पार्थ मुंडे,बाळासाहेब खाडे,अक्षय शेळके,उदय पोवार, सरफराज रिकीबदार, प्रवीण पाटील,संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी,मंगल खुडे,पूजा आरडे, उज्वला चौगले,वैशाली पाडेकर,चंदा बेलेेेकर  यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!