
कोल्हापूर : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष. ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाच्या नकारात्मक पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पक्षाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष – अनिल साळोखे, शिरीष देसाई – सहकार सेल जिल्हाअध्यक्ष, बाळासाहेब देशमुख – सेवादल जिल्हाध्यक्ष यांचीही विशेष उपस्थिती होती.यावेळी बोलताना, ए. वाय. पाटील म्हणाले की, आज देशात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती पाहता देशालाा, पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तव्य आज प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवले पाहिजे. आणि त्यानुसार आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांचा प्रजाहितदक्ष राज्यकारभार सर्व राज्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेतले पाहिजे. आणि त्यांच्यासारखाच सर्वजण हिताय आणि सर्वजण सुखाय कारभार केला पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. असेही पाटील म्हणाले.तर भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची थोरवी गायली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी जो आदर्श घालून दिला आहे. त्यानुसारच आपण काम करत असून.. यापुढेही हे कार्य अखंड चालू राहील असे सांगितले.यावेळी समाजाचे वरिष्ठ नेते – दत्ता हजारे, प्रा. राजेंद्र कोळेकर, प्रा. लक्ष्मण करपे, महादेव सनगर यांनीही आपले विचार व्यक्त केले.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा कार्यअध्यक्षपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संतोष जाधव, गणेश पवार, हरिभाऊ काळे, अर्जुन जाधव, मंजुनाथ माने, मच्छिंद्र बनसोडे, विकास घागरे, संभाजी पाटील, संभाजी हराळे, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अनिल पुजारी सर – अध्यक्ष, भटके, विमुक्त जाती – जमाती सेल, कोल्हापूर दक्षिण विधानसभा यांनी मानले.
Leave a Reply