सहा पदरी महामार्गामुळे रस्ता सुरक्षा वाढेल

 

कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव ना. हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला.कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा हा सर्वे झाला.या आधी झालेल्या चारपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे काही तांत्रिक त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे रस्ते वाहतुकी सहप्रवासी वाहतुकीलाही अडचणी व धोके निर्माण झाले होते. या महामार्गाच्या सहापदरी कारणामुळे हे सर्व धोके व अडचणी निघून जाऊन वाहतूक सुरळीत होईल. या सर्वेमध्ये महामार्गावरील बोगदे, जोड-रस्ते उड्डानपुले, तसेच भुयारी मार्ग आदी समस्यांचा अभ्यासपूर्ण सर्वे झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्ग सेवा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव पसारे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, सर्वेअर व्ही. एन. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!