
कोल्हापूर : मी आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की, माझ्याकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लोकांना अॅनाकोंडाप्रमाणे गिळून त्यांचे जीव घेण्याचे पाप यासह रुग्णांना मानसिक त्रास व आर्थिक लुबाडणूक करण्याचे काम डॉ.कौस्तुभ वाईकर यांनी केले आहे आणि यात त्यांच्या पत्नी डॉ.अनुष्का वाईकर ही तितक्याच सहभागीदार आहेत.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अशा “कसाई” डॉक्टर विरोधात तात्काळ कारवाई करून घेतलेला निर्णय हा डॉ.वाईकर यांच्या जाचास बळी पडलेल्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांचा प्राथमिक विजय आहे. डॉ.वाईकर यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या तक्रारीत वाढ होत असून, डॉ.वाईकरच्या अन्यायास बळी पडलेले रुग्ण, नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत आहेत. याची माहिती सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी घ्यावी.रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा छळ करायचा, आर्थिक लुबाडणूक करायची, रुग्णावर चुकीचे उपचार करायचे हा धंदाच डॉ.वाईकर दांपत्यानी कायम ठेवला आहे. कोरोना काळात समस्त आरोग्य यंत्रणा माणुसकीच्या नात्याने रुग्णांसाठी देवदूताचे काम करत आहे. ९८% डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आपली जबाबदारी ओळखून खरी रुग्णसेवा करण्यात मग्न आहेत, अशा सर्वांच्या कार्याला माझा सलामच आहे. परंतु, डॉ.वाईकर दांपत्यासारखे एक-दोन टक्के डॉक्टर पैश्याच्या हव्यासापोटी लोकांची करत असलेली लुट ही संपूर्ण आरोग्य यंत्रणेस बदनामी करणारी ठरत आहे. डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या धमकीस मी भिक घालत नाही. अशा दाव्यांना घाबरून समाजहिताची कामे थांबविणे माझ्या रक्तात नाही. यापूर्वीही एका माजी मंत्री महोदयांच्या सांगण्यावरून पोलीस अधिकाऱ्यास हाताशी धरून खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण, अशा खटल्यांची पर्वा जनहिताची कामे करताना मी करत नाही. या उलट डॉ.वाईकर नागरिकांची दिशाभूल करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा आणि वाईकर दांपत्याचा कोणताही वैयक्तिक वाद नाही, कि कोणता मालमत्तेवरून वाद नाही. पण, डॉ.वाईकरच्या कृष्णकृत्यास बळी पडलेल्या नागरिकांकडे पाहून त्यांना न्याय देण्यासाठी हा आपला लढा आहे आणि या लढ्यात रोज एक- दोन तक्रारदार स्वत:हून सामील होत आहेत. माझ्या सामाजिक कार्यात मी हजारो रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया, उपचाराचा लाभ दिला. स्वत: जावून मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील रुग्णालयात रुग्णांना दाखल केले आहे. याची माहिती डॉ.वाईकर यांनी आधी घ्यावी. डॉ.वाईकर कडे गेलेला पेशंट एक तर कर्जबाजारी होतोच पण, जिवंत परत येण्याची शाश्वती नाही, याची मला खात्री आहे. कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कट प्रॅक्टीस करणाऱ्या काही डॉक्टर्स कडून २० ते ३० टक्के कमिशन देवून नातेवाईकांना फसवून पेशंट डॉ.वाईकर च्या रुग्णालयात दाखल केले जातात. आणि पेशंट दाखल झाला कि त्याला आयुष्यातून उठविण्याचे काम डॉ.वाईकर दांपत्य अगदी सहजपणे करून जातात.दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मी घेतलेल्या बैठकीचा आणि झालेल्या कारवाईचा धसका घेवून नागरिकांचे मन विचलित करण्यासाठीचा केविलवाणा प्रकार म्हणजे डॉ.वाईकर यांची कालची पत्रकार परिषद.. महानगरपालिका येथे झालेल्या बैठकीचा इतिवृत्त मागवून तो डॉ.वाईकर यांनी तपासावा. लोकांच्या भावना डॉ.वाईकर यांच्याबाबतीत तीव्र असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला आणि तात्काळ कारवाईचा निर्णय दिला.सिद्धांत हॉस्पिटलमध्ये नैतिकतेने काम चालू असल्यास, रुग्णांच्या तक्रारी दाखलच का होतात? याचा विचार डॉ.वाईकरनी करून कृतीत बदल करावा. जर पेशंटचा बळी गेला नसेल तर शासनापासून सिद्धांत हॉस्पिटलने माहिती लपविण्यामागे अथवा माहिती अपलोड न करण्यामागचे गौडबंगाल काय आहे? गत कोरोना काळापासून आजपर्यंत सिद्धांत हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची सविस्तर माहिती डॉ.वाईकर यांनी प्रशासनाकडे सादर करावी, यातून सत्यस्थिती सर्वांच्या समोर येईल.मला कोणालाही बदनाम करण्याचा वैयक्तिक हेतू नाही. पण, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करण्याची आपली पद्धत असून, लोकांवर होणारा अन्याय यापुढेही खपवून घेतला जाणार नाही. डॉ.वाईकर डॉक्टरांच्या अशोभनीय कृत्यांच्या व्हिडीओ रुग्णांच्या नातेवाईकांकडे उपलब्ध असून, रुग्णांच्या नातेवाईकानी केलेले आरोप खोटे असल्याचे डॉ.वाईकर याने खुल्या मैदानात येवून सिद्ध करावेत.
Leave a Reply