ऑटोरिक्षा अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात

 

कोल्हापूर : परिवहन विभागाने कोरोना संकट काळामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या ऑटो रिक्षा परवाना धारकांना रु. १५०० इतके अनुदान जाहीर केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र परवानाधारकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ऑटोरिक्षा संघटना, डीलर्स, ड्रायव्हिंग स्कूल इत्यादींना ऑफलाइन डेमो ट्रेनिंग देण्यात आले होते .

       त्याचा फायदा जिल्ह्यातील सर्व संघटना आणि इतर सामाजिक संस्था यांनी घेतला व त्यांनी ऑटो रिक्षा परवाना धारकांना अर्ज करण्यासंबंधी मदत करणारी केंद्रे चालू केली.  त्यानुसार आजपर्यंत परिवहन कार्यालयाकडे सुमारे 6000 इतके अर्ज प्राप्त झाले .परिवहन कार्यालयाने आपला कर्मचारी वर्ग पूर्णवेळ या कामात लावून 5400 इतक्या अर्जांवर कारवाई केली आहे.  केंद्रीय प्रक्रियेद्वारे परवाना धारकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली. अनुदान जमा झाल्याने परवानाधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!