
कोल्हापूर :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणात २० टक्के पाणीसाठा ठेवावा तसेच धरणातील पाणी हे नियोजनपूर्वक सोडावे अशा सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना केल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणातील पाणी विसर्गाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी राधानगरी धारणातील उपलब्ध जलसाठ्याची पाहणी केली.यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्याकडून धरणाच्या सुरक्षेसह धरणातून सध्या होत असलेल्या पाण्याच्या निसर्गाची माहिती घेतली. सध्या धरणात २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या भागात अतिवृष्टी झाल्यावर हे धरण लवकर भरते. त्यामुळं संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी आणि पूर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणात जूनअखेर २० टक्केच पाणीसाठा ठेवावा. पाण्याचा विसर्ग हा योग्य नियोजन करूनच करावा. त्याचबरोबर पावसाळ्यात सर्व अधीकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राधानगरी धरणावरील सीसीटीव्ही तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबतच्या सूचनाही नामदार सतेज पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना दिल्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. जी. माने, शाखा अभियंता विवेक सुतार, समीर निरुके, ए वाय पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply