राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय अद्यावत करा : आ. चंद्रकांत जाधव

 

कोल्हापूर : कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्यावत करावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, हे अधोरेखीत झाले आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय साहित्य व औषधांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयांच्या मागणीची वाट न पाहता, राज्य सरकारने आरोग्य विभागामार्फत एक टास्क फोर्सची स्थापना करावी. हे टास्क फोर्स राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना भेट देऊन रुग्णालयांतील सर्व वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधसाठा यांची पाहणी करतील व रुग्णालयांसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय उपकरणे, साहित्य यांची माहिती घेतील. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची बैठक घेऊन, रुग्णालयाच्या सध्य स्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर जिल्हा रुग्णालयांमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार मिळावेत, या दृष्टीने आराखडा तयार करतील. टास्क फोर्सने तयार केलेला आराखडा आरोग्य विभागास सादर करातील. राज्य सरकारने या अहवालाचे लेखापरिक्षण करावे आणि जिल्हा रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करुन, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करता आले पाहिजेत. या दृष्टीने रुग्णालयास सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
आरोग्य यंत्रणा सक्षम व अद्यावत असेल तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर लवकर मात करत करता येईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!