
कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आज एक जुलै रोजी अनुराधा भोसले यांच्या अवनी या निराधार महिला वसतीगृहात भेट देऊन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अनुराधा भोसले यांनी एकटी व अवनी संस्थेचे कामकाज कसे चालते याची माहिती दिली. जीपीएचे अध्यक्षा चे आभार मानले. यावेळी जीपीए अध्यक्षा डॉ. उषा निंबाळकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जीपीए अध्यक्षा डॉ.उषा निंबाळकर, सेक्रेटरी डॉ. महादेव जोगदंडे, डॉ.वर्षा पाटील, डॉ. उद्यम व्होरा,डॉ.शिवपुत्र हिरेमठ,डॉ. विलास महाजन,डॉ.शिवराज जितकर,डॉ. राजेश सातपुते, डॉ. राजेश कागले,डॉ. राजेश सोनवणे उपस्थित होते.
Leave a Reply