कौस्तुभ गावडेच भावी शिक्षक आमदार : पाच जिल्ह्यातील समस्त शिक्षक आणि संस्थांचा विश्वास

 

पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने सोलापूर शहरात वेग घेतला असून विविध शिक्षक संघटना, शिक्षक नेते आणि शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबा व्यक्त केला जात आहे. शिक्षकांचे प्रश्न, न्याय्य हक्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा निर्धार शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे.

कला अध्यापकांसह शिक्षकवर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज आवश्यक असल्याने युवा नेतृत्व विधान परिषदेत जाणे आवश्यक आहे.शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे हे विधान परिषदेत पोहोचणे आवश्यक आहे.दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अपेक्षा आणि समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, अशी भावना त्यांनी व्यक्त करत सोलापूर, कोल्हापूर, सांगली पुणे आणि सातारा जिल्ह्यात कौस्तुभ गावडे यांचे प्रचाराचे पाढे जड होताना दिसत आहे.

सोलापूर शहरातील या प्रचार मोहिमेतून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवा-सुरक्षा, जुनी पेन्शन योजना, नियमित शिक्षक भरती, अनुदानाचे प्रश्न आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांकडून मिळणारा पाठिंबा कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ देणारा ठरत आहे.शिक्षकांचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळावे, या भावनेतून सोलापूरमध्ये प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराने सोलापूरच्या शिक्षक वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!