
कोल्हापूर: गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांनी आज महाराष्ट्र राज्याचे, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृती स्थळास (सांगली) येथे आपल्या कुटूंबियां समवेत अभिवादन केले.
स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या जडण घडणीत मोलाचे योगदान दिले आहे.महाराष्ट्र उभारणीतील सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा विकास व विस्तार होय. तसेच त्यांनी सहकाराच्या माध्येमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्ध व्यवसायचा विकास साधन्याचा यशस्वी प्रयत्न केला.त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आज लाखो कुटुंबे सक्षम झाले आहेत. तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी शेतक-यांच्या साठी दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले.
जुनी आठवण सांगताना श्री पाटील म्हणाले की ज्या दूध संस्थेच्या माध्यमातून माझी गोकूळ दूध संघातील मधील वाटचाल चालू झाली ती श्री. शाहू छत्रपती सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या., शिरोली दुमाला या संस्थेच्या स्थापनेवेळी मला स्वर्गीय वसंतदादांनी व त्यांचे सहकारी स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील (साखराळे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यावेळी महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था होती.दुसरी संस्था काढणे त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत शक्य नव्हते परंतु तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादांनी तत्कालीन कृषी राज्य मंत्री श्रीपतराव बोंद्रे दादांना सांगून ते आमचे स्नेही आहेत तरुण होतकरू आहेत त्यांना दूध संस्था रजिस्ट्रेशन व संकलनासाठी परवानगी तात्काळ द्या असा आदेश दादांनी तात्कालीन जिल्हाधिकार्यांना काढला.व सहाय्यक निबंधक दांडेकर यांनी १० फेब्रुवारी १९७८ रोजी सस्थेस नोंदणी प्रमाणपत्र व संकलनास परवानगी दिली गेली या सस्थेची ४३ वर्षाची यशस्वी वाटचाल चालू आहे .शाहू दूध संस्थेचा संस्थापक ते महाराष्ट्र राज्यातील सहकारातील अग्रगण्य गोकुळ दूध संघाचे चेअरमन हा राजकीय सामाजीक प्रवास दादांचे विचार व त्यांच्या सहकार्याची मला नेहमीच आठवण राहील.यावेळी दादांच्या स्मृती स्थळास अभिवादन करताना चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील, श्रीमती जयश्री मदन पाटील ,सांगली महानगर पालिकेचे उपमहापौर उमशे पाटील, तुकाराम पाटील(आण्णा), शंकरराव पाटील, अरविंद पाटील(पद्माळे), विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सग्रांमसिंह पाटील, विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पाटील, दादांचे पणतू हर्षवर्धन प्रतिक पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पाटील, राहूल पाटील, पार्थ पाटील तसेच पाटील कुटूबीय उपस्थित होते.
Leave a Reply